कुडाळ :
११ ते १३ मे या कालावधीत बिबवणे गावचे ग्रामदैवत श्री देव गिरोबा मंदिराचा वर्धापन दिन तसेच श्री देव रवळनाथ व श्री देव नितकारी स्थिर प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ११ मे रोजी दुपारी २.३० वाजता श्री देव गिरोना मंदिर येथे तरंग काठी नेसविणे, दुपारी ३.३० वाजता श्री देवतांना हाक मारणे व कुलदेवता मंदिर येथे तरंग काठीसह जाऊन श्री देव रवळनाथ देवतांची पाषाणे श्री देव गिरोबा मंदिरात आणणे, रात्री ८ वाजता ग्रामस्थांची भजने, १२ मे सकाळी ८ वाजल्यापासून प्रायश्चित विधी, देवतावंदन, गणेशपूजन, पुण्याहवाचन, पंक्षप्राशन, मातृकापूजन, नांदिश्राद्ध, संभारदान, आचार्यपूजन, श्री देव गिरोबा मंदिर वर्धापनदिन – लघुरुद्र व सत्यनारायण महापूजा, ब्राह्मणपूजन, प्राकारशुद्धी, जलाधिवास, ब्रह्मादिमंडल, देवतास्थापन, शय्याधिवास, वास्तुमंडलस्थापन, देवतास्थापन, अग्निस्थापन, ग्रहयज्ञ, मुख्यदेवता हवन, लघुपूर्णाहूती नंतर तीर्थप्रसाद व महाप्रसाद
रात्री ८. वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ ( तेंडोली ) यांचे ‘कल्पाक्ष गणेश’ नाटक, १३ मे रोजी सकाळी ८. वाजता शांतीपाठ प्राकारशुद्धी स्थापित देवता पूजन, तत्वहोम, १०.०९ वाजता कलशारोहण , मुख्यदेवता मूर्ती प्रतिष्ठापना, तत्वन्यास, प्राणप्रतिष्ठापूर्वक महापूजा, बलिदान, पूर्णाहूती, अभिषेक, महानैवेद्य, महाआरती, सामूहिक गाऱ्हाणे, दुपारी महाप्रसाद , सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ११ वाजता श्रींची पालखी मिरवणूक आदीं कार्यक्रम होणार आहेत.
भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव गिरोबा पंचायतन (बिबवणे) समस्त मानकरी व ग्रामस्थ यांनी केले आहे.