You are currently viewing दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याच्या माध्यमातून खांबाळे गाव आदर्श मॉडेल बनवूया…

दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याच्या माध्यमातून खांबाळे गाव आदर्श मॉडेल बनवूया…

राज्य मानव संसाधनचे अक्षय पाटील यांचे दशवार्षिक सूक्ष्म नियोजन कार्यशाळेत प्रतिपादन…

वैभववाडी

खांबाळे गावाची निवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा करून मागेल त्याला काम देण्याच्या उद्देशाने निवड झाली असून याचा फायदा गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन गाव आदर्श कसे होईल या दृष्टीने काम करावे जेणे करून सदरील आराखडा कागदावर न राहता तो प्रत्यक्षात कामांच्या माध्यमातून दिसून येऊ देत व अधिकाधिक लाभार्थी कसे लखपती होतील हाच दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी एकजुटीने काम करा असे प्रतिपादन राज्य मानव संसाधन चमुमधील अक्षय पाटील यांनी केले.

यावेळी सहायक गट विकास अधिकारी शशिकांत भरसट, सरपंच गौरी पवार, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, उपसरपंच गणेश पवार, सामाजिक वनीकरणचे प्रकाश पाटील, विद्या जाधव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुरव, प्राजक्ता कदम, रोजगार हमी कक्षाचे तालुका सहायक स्थापत्य अमित चव्हाण, तांत्रिक सहायक कृषी अधिकारी साईप्रसाद तेली, ग्रामसेवक शिवाजी कदम,रोजगार सेवक मंगेश कांबळे , सिडीईओ सविता पवार, कृषी सहायक मीनाक्षी भुजंग, अंगणवाडी सेविका धनश्री देसाई, पूजा गुरव, पूजा पवार, प्रभाग संघ व्यवस्थापक माधुरी पवार, सीआरपी सुप्रिया साळुंखे, सुप्रिया मोहिते, आशा स्वयंसेवीका शामली देसाई, प्राची पवार,अक्षता कांबळे, ग्रा.पं. कर्मचारी अंबाजी पवार, ग्रामस्थ दाजी बर्गे, गंगाधर पालकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा