You are currently viewing समर शूटिंग कॅम्प रायफल नेमबाजी प्रशिक्षणाचे मालवण मध्ये आयोजन

समर शूटिंग कॅम्प रायफल नेमबाजी प्रशिक्षणाचे मालवण मध्ये आयोजन

मालवण

अभ्यासातील प्रगती बरोबरच स्पोर्टमन होण्याची संधी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समर शूटिंग कॅम्प रायफल नेमबाजी प्रशिक्षणाचे मालवण मध्ये आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प तीन दिवसाचा असून दिनांक 13 14 व 15 मे 2022 असणार आहे.
कॅम्प ची वैशिष्ट्ये :-
सुसज्ज व अद्ययावत शूटिंग रेंज, नेमबाजी खेळाची संपूर्ण ओळख, नेमबाजी खेळातील वेगवेगळे पवित्रे, वेगवेगळ्या एअर रायफल शी ओळख, युवकांमध्ये आत्मविश्वास तसेच एकाग्रता वाढीस मदत, राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळात समाविष्ट होण्यासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व विविध पुस्तक पुरस्कारांनी सन्मानित खेळाडूंचे वेळोवेळी मार्गदर्शन, नेमबाजीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच सरकारी नोकरी साठी राखीव जागा अशी आहेत.
या तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन दादा पवार यांचे रॉयल पवार शूटिंग सेंटर मालवण देऊळवाडा, पॉवर हाऊसच्या मागे, मालवण येथे करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी दादा पवार 7030253999 येथे संपर्क साधावा असे आवाहन दादा पवार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा