You are currently viewing भेडशी-दोडामार्ग पर्यायी मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा – संतोष भिसे

भेडशी-दोडामार्ग पर्यायी मार्गावरील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा – संतोष भिसे

दोडामार्ग

दोडामार्ग तिलारी मुख्य रस्त्यावरील भेडशी खालचा बाजार येथील पूल कमी उंचीचा असल्याने त्याठिकाणी मुसळधार पडलेल्या पाऊसात मोठ्या प्रमाणावर पाणी येते.त्यामुळे वाहने ही पर्यायी मार्गाने वळवली जातात मात्र पर्यायी मार्ग हा पुर्णपणे खड्डेमय असल्याने त्याठीकाणाहुन वाहने हाकताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागतात.वारंवार लेखी तसेच तोंडी सांगुनही संबंधित विभाग त्या रस्त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करताना दिसुन येत आहे.त्यामुळे बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा व ठेकेदाराचा जाणीवपूर्वक दुर्लक्षपणा पुर्णपणे चव्हाट्यावर आलेला दिसुन येत आहे.त्यामुळे येत्या १५ तारीख पर्यंत कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थांना घेवून रास्तारोको आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामांना संबंधित विभाग जबाबदार राहिलं असे यावेळी साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य संतोष भिसे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा