You are currently viewing बांदा येथील वीज कर्मचारी जानू पांढरमिसे ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’ पुरस्काराने सन्मानित

बांदा येथील वीज कर्मचारी जानू पांढरमिसे ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’ पुरस्काराने सन्मानित

बांदा

बांदा:महावितरण कंपनीने बांदा शाखा कार्यालय नं.२ चे प्रधान तंत्रज्ञ जानू विठ्ठल पांढरमिसे यांना उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’ म्हणून सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.पांढरमिसे यांनी दाखविलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता, निष्ठा व समर्पितवृत्ती या गुणांचा गौरव करण्यात आला.दर वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एका उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून निवड केली जाते. यावर्षी पांढरमिसे यांना हा सन्मान मिळाल्याने बांदा परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.रत्नागिरी महावितरण मुख्य कार्यालय येथे १ मे, कामगारदिनी कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

पांढरमिसे हे प्रधान तंत्रज्ञ बांदा शाखा कार्यालय क्र.२ सावंतवाडी उपविभाग येथे कार्यरत आहे. तेथे कंपनीने नेमून दिलेल्या कामानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्युत वाहिन्यांची देखभाल करणे, अचानक उद्भभवण्या तांत्रिक स्वरुपाच्या समस्येचे तातडीने निराकरण करणे, त्याचप्रमाणे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे ही कर्तव्ये बजावलेली आहेत.त्याकरीता पांढरमिसे यांनी दाखविलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता, निष्ठा व समर्पितवृत्ती या गुणांचा गौरव ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून मुख्य अभियंता विजय भटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा