पुणे
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचबरोबर चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या कार्पोरेट इंडस्ट्रीज ना चांगले कर्मचारीही मिळू शकणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन” विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा आहे. त्यामुळे यात सहभागी होणाऱ्या कार्पोरेटसना त्यांच्याकडील नवीन कर्मचारी भरतीसाठी सामाईक परीक्षा म्हणून ही परीक्षा पाहता येणार आहे.
काय आहे पात्रता परीक्षा?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन’ विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा (एनक्यूटी) आहे.
यात सहभागी होणाऱ्या कॉर्पोरेट्सना त्यांच्याकडील नवीन कर्मचारी भरतीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणून वापरता येईल.
परीक्षेसाठीच पात्रता?
दोन वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव असलेले युवा कर्मचारी, सध्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांत शिकत असलेले कोणत्याही शाखेचे विद्यार्थी.
कोणत्या क्षेत्रात मिळणार संधी?
माहिती तंत्रज्ञान (आयटी), बीएफएसआय, उत्पादन, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रे यातील कंपन्या आणि टीसीएसमध्ये देखील उपलब्ध नोकरीच्या संधींची माहिती आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठीची सामाईक खिडकी म्हणून ही टेस्ट उपयुक्त ठरते.
परीक्षा कशी देऊ शकतात?
ही परीक्षा उमेदवार आपापल्या घरून देऊ शकतात. परंतु ज्यांच्या कडे पायाभूत सुविधा नसतील ते जवळच्या “टीसीएस आयओएन सेंटर’मध्ये येऊन परीक्षा देऊ शकतात.
परीक्षेचे स्वरूप काय असेल?
परीक्षेमध्ये तोंडी, संख्यात्मक आणि तर्क क्षमतांचा समावेश असून त्याद्वारे उमेदवारांचा सामान्य राष्ट्रीय पात्रता गुणांक (एनक्यूटी स्कोअर) काढला जातो. उमेदवारांच्या आकलन क्षमतांचे निदर्शक म्हणून कॉर्पोरेट्सना हा एनक्यूटी स्कोअर सादर केला जातो.
केंव्हा आणि कितीवेळा परीक्षा देऊ शकता?
एनक्यूटी प्रत्येक तिमाहीमध्ये घेतली जाईल आणि तिचा स्कोअर दोन वर्षांसाठी वैध मानला जाईल. पहिली टेस्ट निःशुल्क उपलब्ध असणार असून ती 24 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत होईल. यासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करायची आहे. उमेदवार आपले स्कोअर्स सुधारण्यासाठी अनेक वेळा ही टेस्ट देऊ शकतात.
परीक्षेसाठी कुठे अर्ज कराल?
https://learning.tcsionhub.in/hub/national-qualifier-test/ या संकेतस्थळावर.