You are currently viewing घुमडे गावातील श्री देवी घुमडाई मंदिराचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

घुमडे गावातील श्री देवी घुमडाई मंदिराचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून घेतले देवीचे दर्शन..

 

मालवण :

तालुक्यातील डोंगर कुशीत वसलेल्या निसर्गसंपन्न घुमडे गावातील श्री देवी घुमडाई मंदिर मूर्तीप्राणप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार दिनाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास रविवारी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.

‘निलेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघातुन मोठ्या मताधिक्याने आमदार होऊदे’ असे गाऱ्हाणे उपस्थित गावकरी यांनी देवी चरणी घातले. यावेळी निलेश राणे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

यावेळी प्रदीप बिरमोळे, महादेव बिरमोळे, सुरेश बिरमोळे, विष्णू बिरमोळे यासह भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाऊ सामंत, घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे, उपसरपंच राजेश सावंत, अमोल केळुसकर, उमेश बिरमोळे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, राकेश सावंत, बाळू राणे, सूर्यकांत बिरमोळे व अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =