You are currently viewing मळेवाड ग्राम सांस्कृतिक महोत्सव २०२२ थाटामाटात संपन्न

मळेवाड ग्राम सांस्कृतिक महोत्सव २०२२ थाटामाटात संपन्न

‘कोकण सुंदरी’ ‘जान्हवी श्रीनाथ’ तर ‘रिया मसुरकर’ ठरली ‘लिटल चॅम्प्स’ ची मानकरी

सावंतवाडी

ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमानाने मळेवाड ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते , या ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 मध्ये सांस्कृतिक महोत्सवात युवतींची कोकण सुंदरी 2022, तर लहान मुलांसाठी लिटल चॅम्प 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवत उत्तरोत्तर रंगत गेल्या. आकर्षक विद्युत रोषणाई व स्पर्धकांना व प्रेक्षकांना ताल धरायला लावणारे संगीत यामुळे ही स्पर्धा आणखीनच रंगत दार होत गेली. पहिल्या फेरीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी वेशभूषा करून स्पर्धकांनी रसिकांची मने जिंकली.कोकण सुंदरी 2022 चा मान रत्नागिरी येथील जान्हवी श्रीनाथ तर रिया मसुरकर ही लिटल चॅम्प्स ची मानकरी ठरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा