” कोकण नर्सरी” च्या संचालक मंडळाची कणकवली येथे बैठक संपन्न
कणकवली
किसान मोर्चा चे माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांनी स्थापित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा नर्सरी व्यवसायिक शेतकरी संचालित ” कोकण नर्सरी”
या नर्सरी उद्योजक शेतकऱ्यांच्या कंपनी संचालक मंडळाची आज कणकवली येथील कार्यालयात बैठक झाली.
या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व कृषी पदवीधर व पदविकाधारक तरुणांना एकत्रित आणून जिल्ह्यामध्ये नर्सरी हब बनवण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यातील सर्व तरुण शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आव्हान ज्येष्ठ शेतकरी नेते, बाळासाहेब सावंत यांनी पत्रकाद्वारे केले आहे.