You are currently viewing जिल्हास्तरीय ऑनलाईन इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेत प्राची मुरकर चे यश….

जिल्हास्तरीय ऑनलाईन इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेत प्राची मुरकर चे यश….

सावंतवाडी

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा राणी पार्वतीदेवी विद्यालय केंद्रशाळा मळेवाड नं. १ ची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी प्राची मदन मुरकर हिने ऑनलाईन इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, कणकवली शाखा यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी ऑनलाईन जिल्हास्तरीय मर्यादित इंग्रजी कविता पाठांतर व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेसाठी एकूण ४५८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्राची हिच्या यशाबद्धल केंद्रप्रमुख म. ल. देसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा मांजरेकर, सहशिक्षक संजय बांबुळकर, विमल भावसार, शीतल वेंगुर्लेकर, नम्रता देऊलकर यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 3 =