देवगड :
कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधून कुणकेश्वर मंदिर देवस्थान श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कुणकेश्वर पर्यटन महोत्सवात 7500 आंब्यांची आरास श्री देव कुणकेश्वर चरणी व मदिरात शनिवारी करण्यात आली होती.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला त्याला आज 75 वर्षे पूर्ण स्वतंत्र करून शतकाकडे वाटचाल करत आहोत याच उद्देशाने 75 ×100 याप्रमाणे 7500 आंब्यांची आरास कुणकेश्वर मंदिरात शनिवारी करण्यात आली होती.आंब्याची सजावट केल्यामुळे कुणकेश्वर मंदिरात देवगड हापूसचे वैभव खुलून दिसत होते.
आज शनिवार असल्याने या पर्यटन महोत्सवात यानिमित्ताने कुणकेश्वरमध्ये पर्यटकांची सकाळपासूनच गर्दी केली होती यात मंदिरात केलेली देवगड हापुस आंब्यांची आरास पाहून पर्यटकांचा मोह काही आवरेना. कोणी ही आरास मोबाईल मध्ये कॅमेराबद्ध करताना तर कोण हा हापुसचा प्रसाद आम्हाला विकत द्या असे देखील पर्यटक भाविक आवर्जून सांगत सांगताना दिसत होते.रविवार पर्यत हा पर्यटन महोत्सव असल्याने पर्यटकांनी भाविकांनी या महोत्सवास उपस्थिती दाखवावी असे आवाहन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट , कुणकेश्वर सरपंच, कुणकेश्वर ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली आहे.