You are currently viewing सारीपाट…

सारीपाट…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी जगन्नाथ खराटे यांचा समाजप्रबोधन लेख

जुन्या काळात एक प्रथा होती. लग्न उरकल्यावर,लग्नाची सर्वं धामधुम संपली की मग नवर्या मुलाच्या घरी दिर ननदा,सासुबाई ह्या सर्वांसमोर, नवरा नवरींनं सारीपाटाचा खेळ खेळायचा असे. परातीतल्या तांदुळाच्या राशिंत अंगठी लपवायचे अन् नवरा नवरी ती शोधून काढायचे.जो आधी शोधून
काढी,तो जिंके,, त्याला अंगदी हुशार समजला जाई.मग,कधी नवरी आधी शोधुन काढी,, तर कधी नवरा मुलगा शोधुन काढायचा…अन् त्यातुन हुशार कोण आहे ते जुनेजाणते मंडळी ठरवायचे.. अजुनही काही ठिकाणी ही प्रथा तग धरुन आहे.लहानपणी आम्ही आम्ही हे सारं कौतुकानं बघायचं.तेव्हा त्यातलं काही कळंत नसे..
अगदी असांच काहीसां सारिपाटाचा खेळ,सद्ध्या,रोजच्या आयुष्यात अगदी कठींन परिस्थितीसोबत प्रत्येक जन खेळत असतो.अन् हे आपल्या नित्याचंच झालं आहे,हृया खेळांत परिस्थिती आपल्या वर कुरघोडी करुन नेहमींच जिंकते.अन,आपन,मेटाकुटीस येत असतो. पन्,नाईलाजाने पुन्हा हा खेळ खेळावांच लागतो.अन,त्याशिवाय आयुष्य जगतांच येणार नाही..
हे असं का होतं?? हा प्रश्न आपल्याला कधी पडंतच नाही,आपन अगदींच त्या घाण्याला जुंपलेल्या,अन्, डोळ्यांवर झापड बांधलेल्या बैलासारखा,आपला संसार ओढुन पुढे नेत असतो.. अन् हे सारेच अनुभवतात..पन् आपल्या ह्या अशा वागण्यामुळे आपनंच परिस्थिती अधिकच जटील करीत असतो..
आपल्या समाजात देशात अथवा जगांत सर्वच ठिकाणी आपन सदैव समस्या,आपदा मग त्या नैसर्गिक असो वा,मानवी असो,त्या परिस्थितीशी सतत सारिपाट खेळुन मुकाबला करित असतो..
अन् ह्यांतंच बुद्धीचा कस लागतं असतो परिस्थिती कशीही असो आपन सदैव अगदी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, धैर्याने सामोरे जाऊन बुद्धिचातुर्याने परिस्थितीशी चार हात केले पाहिजे अन् परीस्थितीला नमवलं पाहिजे.. पाहिजे, अन् असं वागलं तरंच आपन जिंकलो असं समजावं…
परिस्थिती सततंच आपल्याला अपयश देते म्हणून नैराश्याच्या आहारी जाऊन काही मंडळींचा तोल ढळतो.अन ते हवालदिल होऊन आत्मविश्वास गमावून बसतात ‌..तर काही मंडळी अगदी कठिन परिस्थितीतही आपला तोल ढासळु न देता आत्मविश्वासाने महान भव्यदिव्य काम करतात..
इतिहासात डोकावून बघितलं तर,मोठमोठे शास्त्रज्ञ,देशभक्त, जगतजेते विरपुरुष, थोर दैशभक्त, संतमहंत,अन् अशा ह्या विभुती अगदी विपरीत अशा परिस्थितीसोबत सारीपाट खेळुन परिस्थितीला हरवुन विजयी ठरले आहेंत..
कदाचित, मनुष्यातील दिव्यत्वाची अग्णपरिक्षा घेण्यासाठींच अगदी जन्माला आल्यापासुनंच नियती आपल्यासोबत सारीपाट खेळुन आपल्याला शंभर नंबरी सोनं बनवुन तेजःपुंज करीत असावी..अन् माझ्या मते हें अगदी खरं आहे..

जगन्नाथ खराटे–ठाणे…

प्रतिक्रिया व्यक्त करा