You are currently viewing राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण

राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण

– जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी

पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये राज्यातील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. या प्रबोधिनीत प्रवेशासाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी दि. 9 ते 11 मे 2022 या कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

          राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत यासाठी राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन त्यांना पुणे येथील प्रबोधिनीत प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी भोजन, निवास, क्रीडा सुविधा खेळाडूंना दिल्या जातात. त्यासाठी सरळसेवा व कौशल्य राज्यस्तरीय स्पर्धेत पदक प्राप्त केलेल्या 19 वर्षे आतील खेळाडूंना सरळसेवा तर राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या 19 वर्षे आतील खेळाडूंना कौशल्य चाचणीव्दारे प्रवेश दिला जातो. तर अनिवासी क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी राज्यस्तरी व राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. अर्ज केलेल्या खेळाडूंची विभाग व राज्यस्तरीय चाचणी स्पर्धेतून प्रबोधिनीत निवड केली जाणार आहे.

       आर्चरी, ज्युडो, हॅण्डबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमेंटन, शुटींग ,कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टिक आदी क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना अर्ज करता येणार आहे. पात्र खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्म तारखेचा दाखला, आधारकार्ड, क्रीडा प्रमाणपत्रे जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश अर्ज सादर करावा. असे आवहान करयाण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे , मोबा. क्र. 8208882591 व क्रीडा अधिकारी मनिषा पाटील,मोबा.क्र.7588461688 यांचेशी संपर्क साधावा. असे  क्रीडा विभागामार्फत कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा