You are currently viewing मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कंत्राटी वायरमन मृत्यू प्रकरणी आर्थिक सहाय्य द्या!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कंत्राटी वायरमन मृत्यू प्रकरणी आर्थिक सहाय्य द्या!

आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री सचिवालयाकडे मागणी

 

सविस्तर अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मालवण :

विजेचा धक्का लागून गंभीर जखमी होत उपचारादरम्यान मृत्यू झालेले कंत्राटी वायरमन आनंद कृष्णा मिराशी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे केली होती. आनंद कृष्णा मिराशी (22, आचरा – वरचीवाडी) आचरा उपविभागात कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होते. 9 एप्रिल रोजी विजेचा धक्का लागून ते जखमी झाले. 10 एप्रिल रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्री मिराशी यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची व गरिबीची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री सचिवालयाने याप्रश्नी सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले असून, याप्रश्नी सविस्तर अहवाल सादर करावा. व जिल्हाधिकारी स्तरावरून कोणत्याही योजनेतून अर्थसहाय्य अनुज्ञेय असल्यास ते द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा