You are currently viewing राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टींग स्पर्धेत संजय साटम ठरले “स्ट्राँग मॅन ऑफ दि महाराष्ट्र’…

राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टींग स्पर्धेत संजय साटम ठरले “स्ट्राँग मॅन ऑफ दि महाराष्ट्र’…

सायली घारेंना “स्ट्राँग वुमन” किताब; ४ सुवर्ण, ३ रौप्य व ३ कास्य पदकांसह सिंधुदुर्गची दिमाखदार कामगिरी…

मुंबई विक्रोळी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत सिंधुदुर्ग पॉवर लिफ्टींग असोसिएशनच्या पॉवर लिफ्टरनी धडाकेबाज कामगिरी बजावत ४ सुवर्ण, ३ रौप्य तर ३ कास्य पदके पटकाविली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील संजय साटम याना “स्ट्राँग मॅन ऑफ दि महाराष्ट्र’ आणि सायली घारे यांनी “स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र’ तर सृष्टी राणे हिने `फर्स्ट रनर ऑफ महाराष्ट्र’ हे किताब पटकाविले.
महाराष्ट्र पॉवर लिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने व दि मुंबई शहर पॉवर लिफ्टींग असोसिएशन आणि उत्कर्ष क्रिडा मंडळ संचलित उत्कर्ष व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळी (पूर्व) येथे राज्यस्तरीय महिला व पुरूष ज्युनियर व ऑल मास्टर्स इक्युप्ड पॉवरलिफ्टींग वुमन अँण्ड स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले होते. या स्पर्धेत राज्यातील 232 खेळाडुंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सिंधुदुर्ग पॉवर लिफ्टींग असोसिएशनच्या सहभागी झालेल्या खेळाडुंनी 4 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कास्य पदके पटकावित दिमाखदार कामगिरी केली.

ज्युनियर अँण्ड मास्टर या गटांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सहभागी झालेल्या पॉवर लिफ्टर खेळाडुंनी पटकाविलेली पदके पुढील प्रमाणे आहेत. सायली घारे, श्रृती राणे, स्वप्नील कदम, संजय साटम यांनी सुवर्ण पदके तर श्रावणी साइम , ऋषिकेश तेली, कैलास पवार यांनी रौप्यपदके आणि चेतना देऊलकर, प्रभुध्दराज नाईक व विनोद चौगुले यांनी कास्यपदक पटकाविली.

या स्पर्धेत लक्ष्मण दळवी, यश तेली, जयेश तेली, ऋतिक भामरे, भुषण कुबडे, साहिल मोर्ये, नित्यानंद वेंगुर्लेकर यांनीही सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उदघाटन जेष्ठ समाजसेवक मुकुंद कारखानीस यांचे हस्ते झाले तर स्पर्धेतील विजेत्यांना ठाण्याच्या आय.एफ.एस. अधिकारी सरोज महेश गवस यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

विजेत्या व सहभागी सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र पाॅवरलिफ्टींग मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुवर्य मधुकर दरेकर , अध्यक्ष पुष्कराज कोले, जनरल सेक्रेटरी सैदल सोंडे, जा़ॅइंट सेक्रेटरी राजेश घाटवळ, सिद्धार्थ चुरी, सिंधुदुर्ग पॉवर लिफ्टींग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी व आंतरराष्ट्रीय पाॅवरलिफ्टींग विजेते दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष राजू बेग, , दिलीप गिरप, कल्पना सावंत, डॉ गणेश मर्गज, प्रविण नाईक, प्रविण गुरव, मंगेश घोगळे, प्रशिक्षक संजय साटम, प्रशिक्षक गणेश वायंगणकर व वैभव मुद्राळे, सिद्धेश नाईक, दिपक राऊळ, विनायक नवार यांनी अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या बाँम्ब निकामी शोध पथकातील पोलीस निरीक्षक संजय पुंडलिक साटम यांची १२ ते १५ मे २०२२ ला दुर्ग छत्तीसगढ येथे आयोजित नॅशनल पाॅवरलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यानी महाराष्ट्र राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टींग स्पर्धेत मानाचा स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र किताब मिळवून सिंधुदुर्ग जिल्हा व पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

रोटरी ३१७० तर्फे प्रोत्साहनपर देणगी

पाॅवरलिफ्टींग खेळासाठी पुरुष व महिला खेळाडूंना प्रशिक्षण देवून, या राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टींग स्पर्धेत उत्तम कामगिरी करणा-या देवगड जामसंडे येथील गणेश वायंगणकर जीम व कासार्डे येथील वैभव मुद्राळे जीम याना रोटरी ३१७० तर्फे रू दहा हजारची प्रोत्साहनपर देणगी असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ यानी सुपूर्द केली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, फ़र्स्ट लेडी प्रतिमा धोंड ,डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश साळगावकर, स्पोर्ट्स सेक्रेटरी महेश अनगोळकर यानी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा