You are currently viewing धामापूर बौद्धवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान

धामापूर बौद्धवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान

मालवण

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचा विद्यार्थी गुणगौरव, आदर्श शाळा, आदर्श शिक्षक सत्कार सोहळा व स्नेहमेळावा येथील ओम गणेश साई मंगल हॉल येथे नुकताच झाला. यावेळी जि. प. प्राथमिक धामापूर बौद्धवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या शाळेला शाल, श्रीफळ, व सन्मानचिन्ह देऊन मालवणचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षक भारतीचे पदाधिकारीही उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याने शाळेचे व उपक्रमशील मुख्याध्यापक दीपक गोसावी व सहकारी तंत्रस्नेही शिक्षक नवनाथ पाटील व व्यवस्थापनं समिती अध्यक्षा व सर्व सदस्य व सरपंच सप्तशिला धामापूरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − one =