You are currently viewing नरडवे धरणग्रस्त आक्रमक

नरडवे धरणग्रस्त आक्रमक

पोलीस बंदोबस्तात सुरु केलेलं काम बंद

कणकवली

तालुक्‍यातील नरडवे महंमदवाडी येथील धरणप्रकल्‍पाचे काम आज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्‍न पाटबंधारे विभागाने केला. त्‍यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाह ोता. मात्र जोपर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्‍न सुटत नाही तोवर प्रकल्‍पाचे काम सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा धरणग्रस्तांनी घेतला आहे. त्‍यामुळे या प्रकल्‍पाचे काम सध्या ठप्प झाले आहे.

नरडवे धरणासाठी येथील शेतकऱ्यांच्या जागा संपादीत करण्यात आल्‍या. मात्र अनेकांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही. धरणाचे काम सुरू झाल्‍यास घोलणवाडीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात बंद होऊन घोलणवाडीचा इतर भागाशी संपर्क तुटणार आहे. तसेच धरणग्रस्तांना पर्यायी शेतजमिनीही दिलेल्‍या नाहीत. हे प्रश्‍न सुटत नाही तोवर धरणाचे काम सुरू होऊ देणार नसल्‍याचा निर्धार प्रकल्‍पग्रस्तांनी केला आहे. या प्रकल्‍पग्रस्तांशी आज पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांनी चर्चा केली. मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे काम सुरू होऊ शकले नव्हते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्यासहित एसआरपी व पोलिस मिळून सुमारे ४० ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

प्रकल्पग्रस्तांच्या वतीने संतोष सावंत, गणेश ढवळ, नित्यानंद सावंत, प्रभाकर ढवळ, जयराम ढवळ, लक्ष्मण ढवळे, वैभव नार्वेकर व इतर प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 − 1 =