You are currently viewing महाराष्ट्र गौरव गीत

महाराष्ट्र गौरव गीत

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रवीण खोलंबे यांची अप्रतिम काव्यरचना

राज्यांमधी शोभतं राज्य,
माझं महाराष्ट्र राज्य ,
गाऊ चला गुणगान आज,
संस्कृतीचा घालुनी साज..!!१!!

संतांच्या जन्माने हो,
पावन झाली ही माती,
शुरविरांच्या शौर्याने‌ हो,
फुलते अभिमाने छाती..!!२!!

कृष्णा, कोयना, गोदावरी,
सप्त सरिता वाहती धारा,
स्पर्श होई अमृताचा,
महाराष्ट्रास सारा..!!३!!

कला, शिल्प कोरिव ‌लेणी,
भरीव नक्षी सुंदर शिला लेख,
अलंकार घालुनी, केला शृंगार,
दिसे सौंदर्यांची खाण, सह्याद्री लेक..!!४!!

माझं महाराष्ट्र राज्य,
लोककलेची नगरी,
संगीत सप्तसुरांच्या लाटा,
उसळुनी येती या सागरी..!!५!!

शिवरायांची शौर्य भुमी,
सांगे गौरवाची ही गाथा,
रणी झुंजले वीर सात,
तिथं नमतो आज माथा..!!५!!

माझं महाराष्ट्र राज्य,
समाज सुधारक, पुढारी,
पुरोगामी महाराष्ट्र माझा,
फुले, शाहु, आंबेडकरी..!!७!!

माझं महाराष्ट्र राज्य,
संत,महंत, पंतांचा,
वैभवशाली संस्कृतीचा,
इतिहास महाराष्ट्राचा..!!८!!

माझं महाराष्ट्र राज्य,
भिन्न वेशभुषा अन् भाषा,
नांदे ऐक्य धरुनी एकसंघ,
महाराष्ट्र देई जगण्याची अशा..!!९!!

युवा कवी प्रविण खोलंबे.
संपर्क- ८३२९१६४९६१

( @ सर्व ‌हक्क लेखकाधीन )

प्रतिक्रिया व्यक्त करा