You are currently viewing मालवण नगरपरिषद महोत्सव ‘जल्लोष २०२२’ १३ ते १५ मे

मालवण नगरपरिषद महोत्सव ‘जल्लोष २०२२’ १३ ते १५ मे

वाळू शिल्पकृती, मालवणी खाद्य पदार्थ, दशावतार, खेळ पैठणीचा, गीतगायनचा समावेश

 सिंधुदुर्गनगरी 

मालवण नगरपरिषदेच्यावतीने १३ ते १५ मे पर्यटन महोत्सव जल्लोष २०२२ हा दांडी समुद्र किनारी साजरा करण्यात येत आहे.  हे तीन दिवस पर्यटनाचे प्रमुख दिवस असले तरी ९ मे पासूनच विविध स्पर्धांना सुरुवात होत आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी या पर्यटन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

                    ९ मे रोजी रांगोळी स्पर्धा, १० मे रोजी रिक्क्षा सजावट तसेच सायंकाळी ४ वाजता पर्यटन दिंडी, फॅन्सी ड्रेस होणार आहे. ११ मे रोजी सकाळी ७ वाजता बिज रन,  सकाळी ८ वाजता  सागरी जलतरण पर्यटन फोटोग्राफी स्पर्धा. १२ मे रोजी सकाळी  ७ वाजता नौकानयन रॅली, संध्याकाळी ५ वाजता पतंगोत्सव आणि रॉक गार्डन येथे सायंकाळी ४ ते ७ वाजता लहान मुलांसाठी किलबिल हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

          शुक्रवार १३ मे रोजी सकाळी ७ वाजता वाळू शिल्प कलाकृती सायंकाळी ४ ते ५ स्थानिक मालवणी खाद्य पदार्थांची पाककला स्पर्धा. ५ ते ५.३० वाजता स्थानिक कलाकारांचे गायन, ५.३० ते ६ उद्घाटन समारंभ ६.३० ते रात्री १० गायन व नृत्य स्पर्धा व स्थानिक दशावतार : महिला व पुरुष.

          शनिवार १४ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ खेळ पैठणीचा संध्‍याकाळी ७ ते रात्री १० मालवण सुंदरी स्‍पर्धा, आमदारश्री शरीरसौष्‍ठव स्‍पर्धा. रविवार १५ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ स्‍थानिक कलाकारांचे गीतगायन ६ ते ७ बक्षिस वितरण व सांगता समारंभ.  ७ ते १० जल्‍लोष सिनेकलावंतांचा मनोरंजनात्‍मक कार्यक्रम.

          या पर्यटन महोत्सवा दरम्यान पर्यटकांना जलसफारी व वॉटरस्पोर्टचा मनमुराद आनंद सवलतीच्या दरात नगरपालिका, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जलक्रीडा व्यवसांयीकाच्या मदतीने घेता येईल. महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यासाठी ९४२२४३५०९५ यावर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − nine =