You are currently viewing पाहुणा

पाहुणा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलिस अधिकारी वासुदेवराव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना

बाई तापला तापला
रविराज हा कोपला
आज नभिचा पाहुणा
वऱ्हाडात ऊतरला !!

वऱ्हाडात ऊतरला
अन चाले तुरुतुरु
धरा झाली कासावीस
जीव लागलेया मरु !!

जीव लागलेया मरु
रानी पाखरांचा सडा
कशा सुकल्या सुकल्या
नदी नाल्याच्या रे कडा !!

नदी नाल्याच्या रे कडा
कशा ऊघडया पडल्या
घोटभर पाण्यासाठी
मृग,गाई व्याकुळल्या !!

मृग,गाई व्याकुळल्या
पोटा शोधती रे जला
गाव रानी कसा सारा
आज हाहाकार झाला !!

आज हाहाकार झाला
रविराज हा कोपला
आज नभिचा पाहुणा
वऱ्हाडात ऊतरला !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(से नि)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा