You are currently viewing अंधेरनगरी

अंधेरनगरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… वक्रतुंड साहित्य व सांस्कृतिक मंच समूह प्रमुख लेखक कवी जगन्नाथ खराटे यांचा समाजप्रबोधनपर लेख..*

 

*अंधेरनगरी..*

 

खरंच , “गरीबी सारखं कोणतंही पांप नाही‌. श्रीमंती सारखं कुठलही पुण्य नाही”,असं अगदी जुनेजाणते लोक म्हणायचे.अन् ह्या गोष्टीचा अनुभव त्यांनी घेतला होता. हे अगदी खरं होतं..आम्हीपन् अगदी लहानपणी त्या गरीबीच्या चटक्यातुन तावुनसलाखुन निघालो होतो, हृया जगांत गरिबांना कुणीही वाली नसतो मग तो समाज असो वा कुठलंही शासन असो… लहानपनी आम्ही आई सोबत रेशनच्या दुकानात जायचो धान्य आणायला.तर,ही भली लांबंच लांब, रा़गंचरांग असे.अन् तासन् तास ताटकळत बसायचो तेव्हा काही गोष्टी आईच्या नजरेस यायच्या. त्या म्हणजे तेव्हा, समाजातले काही मोठ्यांच्या ओळखीचे लोकं,अगदी रांग सोडुन दुकानात शिरायचे अन् चुटकीसरशी रेशन घेवून मोठ्या दिमाखात बाहेर निघून जायचे.‌तेव्हा रांगेत थोडीशी कुजबुज व्हायची,अन् पुन्हा सगळं शांत असे. ते बघून आई म्हणायची,” सगळा “अंधेरनगरी”चा कारभार आहे. आहे.काय करणार??…

तेव्हा,त्या “अंधेरनगरी”शब्दाचा अर्थ आईला विचारला होता.तिनं थोडक्यातंसांगीतल.”अरे जुन्या काळात एक नगर होतं,तिथला राजा हा अगदी स्वतःच्या भोगविलासांत एवढा गुरफटला होता की त्याला प्रजेच्या सुखदुःखाशी काहींच घेणदेनंच नव्हतं,अन् त्यामुळे तिथले सर्व कारभारी अगदी आपल्या मनाला वाटेल तसं वागंत,अगदी अंदाधुंदींचा कारभार करीत होते, अन् बळी तो पिळी अशी अवस्था झाली होती राज्यात. राजांचे नियंत्रण नव्हते शासनव्यवस्था नव्हती,अन्आम्ही ठरवु ती पुर्वदिशा,कोणी कायद्याला जुमानत नव्हतं,आपल्या फायद्यासाठी काहीही करीत होते.,अन मुख्य म्हणजे प्रजेमध्ये एकी नव्हती,,, अशा ह्या राज्यांची अवस्था अगदी अंधकारमय झाली होती अन् त्यामुळे त्या नगरीला “अंधेर नगरी”असं म्हणायचे..

मला सर्व समजलं होतं तेंव्हा..

अन्आईच्या म्हणन्यांत तथ्य होतं.पन, अजुनही, तेव्हाच्या अन् आताच्या परिस्थितीत काडीचाही बदल झाला नाही असं मला वाटतं.. उलट आता तर परिस्थिती अगदी अधिकंच बिकट होऊन राहिली‌‌..

आपन दररोज वर्तमानपत्र ऊघडुन बातमी वाचली तर,अगदी कथेतल्या अंधेरनगरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. आज काय तर, शेतीसाठी चालना मिळावी म्हणून शेतीसाठी ईतका निधी मंजूर झाला.बिबियाने अवजारे,बाजारपेठ ई सर्व उपलब्ध करुन देण्यात आल्या,तर दुसरीकडे, उद्योगधंद्यांना संजीवनी मिळावी म्हणून सर्वकाही उपाययोजना राबविण्यात आल्या.. इ सर्व काही…..

पन् मला सारखा एकंच प्रश्नपडतो की, हे सारं होत असतानाअजुनही शेतकरी आत्महत्या का करतात? सुशिक्षित बेकार का वनवन फिरतात?अजुनही महिला कितपत सुरक्षित आहे?अशे अनेक प्रश्न भेडसावतात..

अन् माझ्या मते हृयाचं उत्तर हे कथेतल्या अंधेरनगरीच्या कारभारात दडलं असेल … कदाचित्..

शेवटी चालायचंच,, असं म्हणुन सोडुन दिलं पाहिजे.‌कारण काल हा संतत बदलत असतो, अन् परीकथेतली “अंधेरनगरी”वास्तवात प्रगटली असेल असंच म्हणावं लागेल…

 

जगन्नाथ खराटे– ठाणे

दि-२८एप्रील२२

प्रतिक्रिया व्यक्त करा