कामगार नेते सदा मलाबादे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल – ज्युनिअर कॉलेजमध्ये १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन संयुक्तरित्या
साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर कामगार नेते सदा मलाबादे , मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच विद्यार्थीनींचा बौध्दिक व शारीरिक विकास व्हावा ,या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात येतात.याच अनुषंगाने १ मेमहाराष्ट्र दिन व कामगार दिन संयुक्तरित्या साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर कामगार नेते सदा मलाबादे , मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते कामगार नेते कॉम्रेड सदा मलाबादे यांनी
१ मे १८८६ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी एकत्र येऊन आपल्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष केला. भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध हा कामगारांचा पहिला लढा होता.रक्तरंजित संघर्षात अनेक कामगारांचा मृत्यू झाला.शेवटी या संघर्षाला यश आले.कामगारांचे कामाचे आठ तास निश्चित करण्यात आले.अजूनही जगात कामगारांचे शोषण थांबले नाही.आजही जगात भांडवलशाही व्यवस्थेचा समाजावर मोठा प्रभाव आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी , शेतमजूर व कामगार यांचे शोषण होत आहे.त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी ,शेतमजूर,कामगार यांचे राज्य स्थापन करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.इचलकरंजीच्या यंत्रमाग कामगारांचे गुलामासारखे शोषण होत आहे.त्यांना कोणत्याही सुविधा सवलती नाहीत,पेन्शन नाही,ग्रॅच्युईटी नाही.त्यासाठी भांडवली समाज व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य आर. एस. पाटील,उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे,पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे,विद्यार्थिनी प्रतिनिधी आदिती शिंदे,अलहिदा शेख
यांच्यासह शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थिनी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.