You are currently viewing इचलकरंजीत मोफत अन्न सेवा छत्र उपक्रमाचा शुभारंभ

इचलकरंजीत मोफत अन्न सेवा छत्र उपक्रमाचा शुभारंभ

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे वीरशैव उत्कर्ष मंडळ व शिव- बसव सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कै.उद्योगपती मल्लय्या स्वामी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून बसवेश्वर स्मारक परिसरात मोफत अन्न सेवा छत्र उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रउद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी , केएटीपीचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

इचलकरंजी येथे वीरशैव उत्कर्ष मंडळ व शिव- बसव सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सातत्याने
विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येतात.सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून
कै.उद्योगपती मल्लय्या स्वामी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून बसवेश्वर स्मारक परिसरात मोफत अन्न सेवा छत्र उपक्रमाचा शुभारंभ
मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे अशोक स्वामी यांच्यासह विविध मान्यवरांनी समाजातील गरीब ,गरजूंनी या अन्न सेवा छत्र उपक्रमाचा लाभ घ्यावा , असे आवाहन केले.
यावेळी माजी नगरसेवक युवराज माळी,माजी नगरसेवक संजय केंगार, , इरगोंडा पाटील,प्रदिप दरिबे,राजु कोरे,आर.एस. पाटील, सुरेश पाटील , गजानन बिडकर ,शिवबसु खोत, बाळासाहेब कित्तुरे,शंकर बिलुरे,चंदु चौगुले,सुरेश जमदाडे , सुभाष मलाबादे,शेखर दरिबे, उमेश पाटील, विशाल पाटील ,अनिल पाटील , सुनिल चिगळे,अनिल येलाज, नागेश पाटील तसेच वीरशैव उत्कर्ष मंडळाचे पदधिकारी , लिंगायत समाजबांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा