You are currently viewing बांदा केंद्रशाळेत सर्वाधिक उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

बांदा केंद्रशाळेत सर्वाधिक उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

बांदा

उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं .१ शाळेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शंभर टक्के व सर्वाधिक उपस्थिती असलेल्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बांदा केंद्रशाळेत विवध उपक्रम राबविण्यात येत असतात. जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या म्हणून ओळख असलेल्या या शाळेत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून समकक्ष वर्गात प्रवेश मिळवून दिला.विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित रहावी म्हणून चालू वर्षी सर्वाधिक उपस्थिती असलेल्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख संदीप गवस,मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर आदि मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सरोज नाईक ,उर्मिला मोर्ये,रसिका मालवणकर ,रंगनाथ परब ,जे.डी. पाटील ,शुभेच्छा सावंत ,वंदना शितोळे,जागृती धुरी आदि शिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा