You are currently viewing सावंतवाडी नगरपरीषदेचा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

सावंतवाडी नगरपरीषदेचा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील बेरोजगारांसाठी ३ कोटी ३६ लाख रुपये इक्युपमेंट स्किल डेव्हलपमेंट सेंटर सिंधू रत्न मधून देण्याची घोषणा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष, आमदार दीपक केसरकर यांनी नगरपरिषदेच्या कार्यक्रमांमध्ये केली.त्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते

आमदार दीपक केसरकर म्हणाले, नगरपरिषदेला रुग्णवाहिके बरोबर शववाहिनीसाठी नऊ लाख रुपये तरतूद आपल्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर मुख्याधिकारी जयंत जावडेकर, वसंत केसरकर ,राजू मसुरकर ,अनारोजीन लोबो, साक्षी वंजारी ,राजन पोकळे, पुंडलिक दळवी, गोविंद वाडकर व माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले,
कोविड साथीत रूग्णवाहीका कमतरता होती यासाठी दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी या ठिकाणी सहा अँम्बुलन्स मंजूर केल्या आहेत तर ९ लाखांची शववाहिनी देण्याची घोषणा. शीत शवपेट्याही देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.संत गाडगेबाबा भाजी मंडईसाठी १५ कोटी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले आहे. मंदिरांना हायमास्ट दिले जाणार आहेत. वीज बिलाची बचत व्हावी यासाठी सोलर वर चालणारे शहराला दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांनी निधी मंजूर करून सहकार्य केले. तसेच शहरासाठी शववाहिनीसाठी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी आभार प्रदर्शन आरोग्य विभागाच्या सौ रसिका नाडकर्णी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा