You are currently viewing मडुरा उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड, सातार्डा येथे नोकरी मिळणे बाबत श्री देवी माऊली संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण..

मडुरा उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड, सातार्डा येथे नोकरी मिळणे बाबत श्री देवी माऊली संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण..

सावंतवाडी

श्री देवी माऊली संघर्ष समिती मर्यादित.,मडुरा उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड, सातार्डा येथे नोकरी मिळणे बाबत बेमुदत उपोषण उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड, सातार्डा सावंतवाडी सिंधुदुर्ग या कंपनीने उत्तम स्टील अँड पॉवर लिमिटेड येथे १६०० एकर जमीन खरेदी केली आहे. या प्रकल्पामध्ये मडुरा दशक्रोशीतील तरुणांना कंपनीत नोकरी मिळावी व दशक्रोशीतील नागरिकांवर झालेला अन्याय दूर करावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिनांक ३० मार्च २०२२ निवेदन सादर केलेले होते परंतु जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही सुद्धा तसेच केंद्रातील सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, ऊर्जामंत्री तसेच माननीय मुख्य सचिव त्याचप्रमाणे पालकमंत्री, खासदार आणि जिल्ह्यातील तीनही आमदार यांना निवेदन देऊन एक महिना झाला तरी कोणत्याही प्रकारची हालचाल व कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी केलेली नाही म्हणून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे यावेळी उपोषणाला श्री जगन्नाथ पंडित, (अध्यक्ष संघर्ष समिती, मडुरा) वसंत विठ्ठल धुरी, (माजी सरपंच, सातोसे) समीर गावडे (सरपंच, निगुडे) श्रीकृष्ण भोगले (शिवसेना शाखाप्रमुख, मडुरा) गुरुदास गवंडे (उपसरपंच, निगुडे) विश्वनाथ राणे (सामाजिक कार्यकर्ते, कास) तसेच रोणापाल सरपंच श्री सुरेश गावडे सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचार घेऊन उपोषणस्थळी दाखल झाले आहेत त्यांची मेडिकल चाचणी केली असता त्यांना जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्याची गरज आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे परंतु जोपर्यंत नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम आहे असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा