You are currently viewing असलदेत महाराष्ट्र दिनी अपंग महीलेच्या हस्ते ध्वजारोहण

असलदेत महाराष्ट्र दिनी अपंग महीलेच्या हस्ते ध्वजारोहण

नांदगाव प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या वतीने आज १ मे महाराष्ट्र दिनी असलदे मधली वाडी येथील ८० वर्षीय अपंग महीला सौ.जयश्री रामचंद्र लोके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.
२६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी सुध्दा येथे स्वातंत्र्य सैनिक महादेव तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.
आज महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण साठी सरपंच पंढरी वायंगणकर उपसरपंच संतोष परब ग्रामसेवक आर.डी.सावंत, ग्रामपंचायत सदस्य सौ.संचिता नरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा