समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देण्यास महासंघ कटिबद्ध
*सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांचे प्रतिपादन*
*मालवण-*
तालुक्यातील काळसे धनगरवाडी ग्रामस्थ गेली १० वर्षे धनगरवाडी साठी पक्का रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान अनेक निवेदने , उपोषणे, आणि आंदोलने करूनही त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नसून त्यांना हवा असलेला रस्ता झालेला नाही. यामुळे त्यांची वारंवार परवड होत असल्याने धनगरवाडीतील ग्रामस्थांनी १ मे २०२२ रोजी महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ सुनिल वरक यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देउन दिला आहे. प्रस्थापित राज्यकर्ते व प्रशासन समाजाला गृहीत धरून चालत आहे त्यामुळे समाजाचा विकास होत नाही. म्हणून आता माघार नाही संघर्ष अटळ आहे त्यामुळे सदर आंदोलनाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत त्या ठिकाणी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहून समाजबांधवांना सहकार्य करणार आहेत व समाजाला न्याय मिळवून देण्यास,महासंघ कटिबद्ध आहे असे प्रतिपादन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ झोरे यांनी केले.महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे साहेब व कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे साहेब जिल्हा अध्यक्ष अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल येणाऱ्या काळात धनगर समाजाला न्याय देण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन उपोषण घेराव जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चालूच राहणार ऑल इंडिया धनगर समाज महासंघ समाजाला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही आमचा शब्द आहे.