सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. धनंजय रासम यांनी केली शत्रक्रिया
शासकीय स्तरावर आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा: पूर्ण शस्त्रक्रिया मोफत
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाची घडामोड सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपजिल्हा या शासकीय रुग्णालयात हीप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजेच (खुब्याचा सांधा बदलणे) ही सांधा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया मालवण तालुक्यातील कट्टा येथील 38 वर्षांच्या तरुणावर पार पडली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी कोणतेही बाहेरून डॉक्टर आणले गेले नाही. तर कणकवलीतील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर धनंजय रासम यांनी ही यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली. महात्मा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत या शस्त्रक्रिये करिताचा लाभ संबंधित रुग्णाला मिळाला. तसेच प्रत्यारोपणा करिता लागणारा सांधा हा देखील शासकीय योजनेतून खरेदी करण्यात आला. यासंदर्भातील प्रशासकीय पातळीवर आलेल्या अडचणी या आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सोडवून ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयातील अशा प्रकारे खुब्याचा सांधा प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. तसेच या संपूर्ण शस्त्रक्रियेत दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक सी. एम. शिकलगार यांनी देखील या संपूर्ण प्रक्रिये करता महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील 38 वर्षीय कट्टा येथील या रुग्णाला गेली वर्षभर खुब्याचा सांधा दुखीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे त्या रुग्णाला नीट चालता देखिली येत नव्हते. त्या रुगणाचे मांडी च्या वरील कमरेला जोडणारे दोन्ही खुब्याचे सांधे खराब झाले होते. याबाबत संबंधित रुग्णाने आमदार वैभव नाईक यांचे या संदर्भात लक्ष वेधल्या नंतर आमदार वैभव नाईक यांनी यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठपुरावा केला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी त्यांनी चर्चा करून सांधा प्रत्यारोपणाचा करिता जी एजन्सी जिल्ह्याकरिता मान्यता दिलेली होती त्या एजन्सी जवळ हा सांधा उपलब्ध नसल्याने त्याऐवजी अन्य दुसऱ्या एजन्सीला या योजनेअंतर्गत वरिष्ठ स्तरावरून मान्यता मिळवून घेत आमदार वैभव नाईक यांनी सुमारे 47 हजार किमतीचा कृत्रिम सांधा योजनेअंतर्गत अगदी मोफत मिळवून दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. धनंजय रासम हे कणकवलीत खाजगी प्रॅक्टिस करत असून, त्यानी एनआरएचएम योजनेअंतर्गत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. दुसऱ्या सांध्याची शस्त्रक्रिया नतर करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतील ही दिलासादायक बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया अगदी मोफत झाली. याकरिता डॉक्टरांचे देण्यात येणारे शुल्क देखील येणारे एनआरएचएम योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनामार्फत अगदी मोफत स्वरूपात या रुग्णाला हे ऑपरेशन करून मिळाल्याने अशा दुर्मिळ शस्त्रक्रिया देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय दवाखान्यांमध्ये अगदी मोफत होऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक नितीन राऊळ व शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांनी देखील पाठपुरावा केला.