You are currently viewing कुडाळ येथे ‘कोकण समर फेस्टीव्हल’ महोत्सव

कुडाळ येथे ‘कोकण समर फेस्टीव्हल’ महोत्सव

कुडाळ :

छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोकण समर फेस्टिवल’  या तीन दिवसीय  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

13 ते 15 मे 2022  या कालावधीत डॉन बॉस्को शाळा कुडाळ येथे संध्याकाळी 4 ते रात्री 10  या वेळेत हा महोत्सव होत आहे. लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना तसेच युवा कलाकारांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती संयोजक मोनाली वर्दम,  गौरी धडाम, हर्षदा पडते, अपर्णा शिरसाठ आणि वैशाली शिरसाठ यांनी दिली.

प्रदर्शनाचे हे पहिलेच वर्ष आहे. जिल्ह्यातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, दागिने, कपडे, कोकणी मेवा, तसेच घरगुती पदार्थ अशा विविध प्रकारच्या वस्तू, सेवा यांचे स्टॉल्स येथे असतील. युवा कलाकारांना संधी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवा मध्ये होणार आहे. लहान मुलांसाठी खेळ, तर गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू याचीही सोय आहे.

या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण जिल्ह्यातील नामवंत चित्रकार अक्षय सावंत, सत्यम मल्हार तसेच रांगोळीकार साई पारकर यांची लाइव पेन्टिंग व रांगोळी उपस्थितांना बघायला मिळणार आहे. तसेच जिल्हातील युवा कलाकार यांचे नृत्य प्रदर्शन देखील पहावयास मिळेल. त्यामुळे या महोत्सवात लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी मनोरंजन, खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.

स्टॉल धारकांनी लवकरात लवकर स्टॉल बुक करुन या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची तसेच आपल्या कलेची ओळख करून देण्यासाठी  +91 8104806757 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. तसेच अधिक माहिती साठी इंस्टाग्राम अकाउंट @kokan_summerfestival ला फॉलो करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा