You are currently viewing माजी नगराध्यक्ष संजू परब राजकीय विरोधक केसरकरांसोबत एकाच व्यासपीठावर…

माजी नगराध्यक्ष संजू परब राजकीय विरोधक केसरकरांसोबत एकाच व्यासपीठावर…

युवराज लखमराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर संजू परब केसरकरांच्या जवळ?

राजकीय विशेष

सावंतवाडी खासकीलवाडा येथील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा नं.४ ला आयएसओ मानांकन मिळाले ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आणि त्याच निमित्ताने शाळेला आयएसओ मानांकन प्रदान सोहळा शाळेच्या नूतन इमारतीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दीपक केसरकर उपस्थित होते, त्यांच्या सोबतच माजी नगराध्यक्ष व जि. प.शाळा नं.४ चे माजी विद्यार्थी संजू परब हे देखील एकाच व्यासपीठावर आले होते.
शाळेला आयएसओ मानांकन प्रदान सोहळ्यातील आपल्या मनोगतात बोलताना माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी “दीपक केसरकर यांनी मला हक्काने हाक मारली, त्यामुळे ते माझे राजकीय वैरी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले” असे म्हटले आहे. संजू परब यांनी जाहीरपणे केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दीपक केसरकर यांच्यावर टीका करण्याची एकही संधी वाया न दवडणारे संजू परब अचानक दीपक केसरकर यांच्या इतके जवळचे कधी झाले? असा प्रश्न कित्येकांच्या मनात उपस्थित झाला.
असा एकही आरोप नसेल जो संजू परब यांनी केसरकरांवर केला नसेल. अगदी ज्या ज्या गोष्टींवर बोलुही नये असे क्षुल्लक आरोप देखील संजू परब आजवर करत आलेले आहेत. आपले राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून केसरकरांना संबोधले आहे, आरोप एवढ्यावरच थांबले नाहीत तर दीपक केसरकर यांनी “यापुढे संजू परब हा विषय आपल्यासाठी संपला, आपण त्यावर बोलणार नाही”. इथपर्यंत प्रकरण गेले होते. परंतु दोघांमधून विस्तव देखील जात नव्हता तिथे संजू परब केसरकरांच्या बाबत अगदी मवाळ भूमिका घेत केसरकर आपले राजकीय वैरी नसल्याचे स्वतःच दाखवून देत असल्याचे सांगतात म्हणजे “देखल्या देवा दंडवत” अशातलाच प्रकार दिसून आला.
संजू परब यांची केसरकर यांच्याबाबत बदललेली, काहीशी मवाळ झालेली भूमिका म्हणजे *युवराज लखमराजे भोसले यांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आदींच्या उपस्थितीत घडवून आणलेला भाजपा प्रवेश हे कारण तर नाही ना?* असा तर्क अनेकांनी काढला आहे. एकवेळ केसरकर म्हणजे सावंतवाडीच्या इतिहासातील वाईट व्यक्ती इथपासून सुरू झालेला प्रवास इतिहासातील घराण्यातील व्यक्ती भाजपामध्ये प्रवेशकर्ती झाल्यावर केसरकरांच्या बाबतची भूमिका अचानक कशी काय बदलली?
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सुंदरवाडीच्या ऐतिहासिक घराण्यातील व्यक्तीला भाजपामध्ये प्रवेश करून सावंतवाडीच्या विधानसभा मतदारसंघातील समीकरणच बदलून टाकले आणि मी मी म्हणणाऱ्यांना विचार करावयास भाग पाडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा