You are currently viewing चंद्राची आरती

चंद्राची आरती

*काव्य आराधना, राष्ट्रीय कवयित्री संमेलन, अक्षर यात्री महिला समूह आदींच्या सदस्या ज्येष्ठ कवयित्री अंजली देशपांडे यांची अप्रतिम काव्यरचना*

*कवितेचे नाव:चंद्राची आरती*

जयदेव जयदेव जय रजनीनाथा,
तिमीराच्या प्रहरी प्रकाश देता,
जयदेव..॥धृ॥

पोर्णिमेला तुम्हीं पूर्णत्वा येता,
अमावस्येला लुप्त पावता,
जयदेव..॥१॥

गणेश चतुर्थीस तुम्हां पाहता,
कोप पावूनी शाप त्वा देता,
जयदेव..॥२॥

कोजागिरीला पावन करिता,
केशर दुधाचा प्रसाद देता,
जयदेव..॥३॥

शांत शीतल रोहिणी नाथा,
चांदण्यांसंगे क्रिडा करीता,
जयदेव..॥४॥

प्रसन्न वदनी शोभे शुभ्र तेजता,
भ्रमण करण्यानिघे सूर्याचा भ्राता,
जयदेव..॥५॥

©® सौ.अंजली माधव देशपांडे.नाशिक.

प्रतिक्रिया व्यक्त करा