सिंधुदुर्गनगरी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि. 30 एप्रिल 2022 व दि.1 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.30 एप्रिल 2022 दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग ओरोस-सिंधुदुर्ग येथे शासकीय वैदयकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग पाहणी. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे कोविड आजार व लसीकरण संदर्भात आढावा बैठक. दुपारी 3.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठक. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकासासाठी संकेतस्थळामध्ये (वेबसाईट) सुधारणा करण्याबाबत. दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे नरडवे प्रकल्पाबाबत आढावा. सायंकाळी 5 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे जिल्हा खरीप हंगाम 2022 ची आढावा बैठक. सायंकाळी 5.30 वाजता जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कृषि महोत्सवाच्या आयोजनाबाबत बैठक. सायंकाळी 6 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद. रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, ओरोस सिंधुदुर्ग येथे राखीव.
रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्रांऊड सिंधुदुर्ग मुख्यालय येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिर्मित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता 43-अ, प्राधिकरण सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे दै. तरुण भारत ओरोस कार्यालय स्थलांतर सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 10.45 वाजता ओरोस, सिंधुदुर्ग येथून मोटारीने वेंगुर्ला कडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता वेंगुर्ला कॅम्प,येथे वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील बॅरिस्टर नाथ पै स्मारक भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 12 वाजता वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण.