You are currently viewing सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे मुंबईमध्ये आयोजन*

सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे मुंबईमध्ये आयोजन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

स्त्री-भ्रूण हत्येविरोधात लढणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षाताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प संस्था, लेक लाडकी अभियान, व मैत्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यशाळेचे” आयोजन मुंबई मध्ये करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे हे यशस्वी १२ वे वर्ष असून, प्रवेशासाठी उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल, तीन महिन्याच्या या प्रमाणपत्र कार्यशाळेमध्ये प्रत्येक रविवारी पूर्ण दिवसाचे प्रशिक्षण तंज्ञातर्फे दिले जाईल. १८ वर्षावरील इच्छुकांनी प्रवेशासाठी संयोजक – सुरज भोईर (9969686014 ) व विनोद हिवाळे (9969391025) यांच्याशी संपर्क साधावा. शेवटची तारीख १५ जुलै २०२३ आहे. प्रवेश मर्यादित राहिल, शिक्षणाची अट नाही. अभ्यासक्रमामध्ये, भारताचे संविधान (राज्यघटना) व्यक्तिमत्व विकास, माहितीचा अधिकार, न्याय व्यवस्था, मानवी हक्क, पोलिस यंत्रणा, नगर राज बिल, जनसंपर्क-प्रसार माध्यम, फुले- अंबेडकर विचारधारा, गांधी विचाराची कार्यशाळा, पर्यावरण रक्षण, युवक कामगार-रेशन चळवळ, स्त्री-पुरुष समानता, गुन्हेगारी-अंधश्रध्दा निर्मुलन, ज्येष्ठ नागरीक, अंध-अपंगांचे प्रश्न, झोपडपट्टी प्रश्न, ग्रामोद्योग व स्वयंरोजगार, बालकामगार निर्मुलन, एड्स व्यसनमुक्ती व गीत पथनाटय या व अशा विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येतील या अभ्यासक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन व संस्था भेटीची कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य विशेष सहकार्य लाभणार आहे.

जागा मर्यादित असल्यामुळे गुगल फॉर्म लिंकद्वारे https://forms.gle/jtq8NNYf3jNx8GVD8 आपली नावनोंदणी लवकरात लवकर करावी, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

 

*संवाद मीडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा