You are currently viewing दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास २ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन

दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास २ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन

दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास २ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन

सावंतवाडी

राज्यातील नगरपंचायत , नगरपरिषद व संवर्ग कर्मचारी त्यांच्या मागण्या बाबत २२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली असून, आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन, या मागण्या योग्य असून, संचालक स्तरावर कोणतीही मागणी प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे आश्वासन या बैठकीत दिले आहे.

यावेळी येत्या दोन दिवसात शासन स्तरावर नगर विकास विभाग आणि वित्त विभाग यांच्यामार्फत योग्य निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीकडून २ मे पासून पुकारण्यात आलेले बेमुदत काम बंद आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी बैठकीत संघर्ष समितीकडून देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा