शीशे के घर रहने वाले पत्थर फेका नही करते; काळे यांचा इशारा
वैभववाडी –
शिवसेना नेते सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावरती जिल्हा बँक मधील नोकरी बचाव भाजप बढाव अशी संकल्पना चालू असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यात वैभववाडी तालुक्यातील एका कार्यकर्त्याला मुलाची नोकरी वाचण्यासाठी भाजप प्रवेश करणे करीता दबाव करत असल्याचे वक्तव्य सतीश सावंत यांनी केले त्यावर ती भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. काळे प्रसिद्धीपत्रकात म्हणतात,
तसं बघायला गेलं तर सहकार क्षेत्रासी माझा काही संबंध नाही परंतु आमदार नितेश राणे यांच्यावर जर टीका होत असेल तर बोलणं भाग आहे आणि ती जर टीका वैभववाडी तालुक्यातील उदाहरण देऊन जनतेची दिशा भुल करणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. नोकरी बचाव भाजप बढाव अशी टीका सतीश सावंत यांनी आ. नितेश राणे यांच्यावर केली आहे. सतीश सावंत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये वैभववाडी तालुक्यातील एका कार्यकर्त्याला त्याच्या मुलाची नोकरी वाचवण्यासाठी भाजप पक्ष प्रवेश करण्याचा प्रयत्न चालू आहे असा उल्लेख केला आहे. मी सतीश सावंत यांना आवाहन करतो की हिंमत असेल तर त्यांनी त्या वैभववाडीतील कार्यकर्त्याचे नाव जाहीर करावे व केलेले आरोप पुराव्यांसहित सिद्ध करावेत अन्यथा आमदार नितेश राणे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत आम्ही ते कदापि सहन करणार नाही व गप्पही बसणार नाही. नोकरी बचाव व भाजप बढाव असी संकल्पना राबवण्याची भाजपला अजिबात गरज नाही भाजप आपल्या कार्यातूनच आपला पक्ष वाढवत आहे. प्रथम राष्ट्र,नंतर पार्टी आणि नंतर स्वतः असे ब्रीद उराशी बाळगून अखंड भारत देशभर भाजपा आपली यशस्वी वाटचाल करीत आहे. २०१९ मधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचे कार्यकर्ते कोणत्या कारणामुळे शिवसेनेत गेले, कोण जिल्हा बँक सत्तेचा दुरुपयोग करत होते, याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे. वैभववाडी तालुक्यातील जनता, मतदार जागृत आहे त्यांना सर्व काही ज्ञात आहे. निवडणुकीमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी वरती कसा दबाव होत होता हेही जनतेने पाहिले आहे. त्यामुळे सतीश सावंत यांनी आ.नितेश राणे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत. शीशे के घर रहने वाले पत्थर फेका नही करते त्यामुळे आरोप करताना सांभाळून करावेत.
सत्तेमधील नेते आहात विकासाचे बोला… वैभववाडी तालुक्यासहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले होते वादळी पाऊस झाल्यामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, पाऊस वादळसहित गारपीट झाल्यामुळे जिल्ह्यातील आंबा,काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आपला शिवसेना पक्ष आणि त्या पक्षाचे नेते म्हणून नुकसानग्रस्तांना नुसकान भरपाई देण्याकरिता आपण काय प्रयत्न केले व आपण काय करणार आहात यावर ही थोडी माहिती जनतेला दिली तर बरं होईल. नुसते राणे कुटुंबीय आणि भाजप यांच्या वर टीका करून काही उपयोग होणार नाही. जनतेला काम पाहिजे विकास पाहिजे आणि विश्वास पाहिजे आणि ते महाविकास आघाडीकडून जनतेला दिसून येत नाही, असा पलटवार भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी चे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे शिवसेनेवर केला आहे.