सावंतवाडी
येथील ज्येष्ठ लेखिका उषा परब यांच्या ‘अचिंत अध्याय’ या कादंबरीचे उद्या दिनांक ३० एप्रिल रोजी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. श्रीराम वाचन मंदिर, आरती मासिक व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखिका उषा परब यांच्या ‘अचिंत अध्याय’ या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कादंबरीचे उद्या सायंकाळी साडेपाच वाजता श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात प्रकाशन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.जी.ए.बुवा असून प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष, नाटककार प्रा.अनिल सामंत उपस्थित राहणार आहेत. पुस्तक परिचय साहित्यिका वृंदा कांबळी करून देणार आहेत तर कादंबरीचे अभिवाचन ॲड. नकुल पार्सेकर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.रुपेश पाटील करणार असून कादंबरी प्रकाशनाला साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड.संतोष सावंत, आरती मासिकचे प्रकाशक प्रभाकर भागवत व लेखिका उषा परब यांनी केले आहे.