You are currently viewing राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष यांची उमेदच्या जिल्हा व्यवस्थापकांविरोधात तक्रार

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष यांची उमेदच्या जिल्हा व्यवस्थापकांविरोधात तक्रार

व्यवस्थापकांची सखोल चौकशी होऊन प्रशासकीय कारवाई व्हावी..

 

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्ह्यामध्ये उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक निलेश वालावलकर हे तालुका स्तरावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांची TADA मधील ५% रक्कम बिल मंजुरीसाठी घेत असल्याची तक्रार निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि डी आर डी ए प्रकल्प संचालक तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे केली आहे.

निवेदनात पिळणकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हामध्ये सन -२०१६ पासून सुरु आहे. तसेच तालुका व जिल्हा स्तरावर कंत्राटी अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा स्तरावर कार्यरत असलेले निलेश वालावलकर हे जिल्हा व्यवस्थापक MIS & ME या पदावर उमेद मध्ये कार्यरत आहेत. त्यांना स्वत:ला प्रवास खर्च व दैनंदनी भत्ता असून देखील गेली तीन वर्ष तालुका स्तरावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांची TADA मधील ५% रक्कम लेखाधिकारी यांच्या नावाखाली सदर रक्कम वालावलकर यांनी घेतलेली आहे. तसेच राष्ट्रीय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (NRETP) साठी वेगळे कार्मचारी नेमलेले आहेत. त्यांच्या कडून देखील ५% रक्कम घेतलेली आहे. चालू वर्षा तील ५% रक्कम तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी देत नसल्यामुळे सदर TADA जाणून बुजून रकवडलेली आहे. हे खरे आहे की नाही, याची शाहनिशा व चौकशी होतानाच सर्व तालुका व जिल्हा स्तरावरील कर्मचारी यांचा प्रवास भत्ता देणेत यावा.

तर वालावलकर यांची सखोल चौकशी होऊन त्यांचेवर प्रशासकिय कारवाही प्रस्तावित करावी. अन्यथा या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी. वालावलकर यांनी काही बचत गटांकडून पैसे घेतले आहेत. त्यांना परत केलेले नाहीत. हा व्यवसाय राजेरोष पणे काही वर्षा पासून सुरु आहे.या विषयी त्यांचावर आळा घालनेत यावा असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान पिळणकर यांनी या निवेदनासोबत ज्या ज्या कर्मचाऱ्यांकडून 5% रक्कम घेतली गेली आहे त्यांच्या नावाची लिस्ट आणि किती रुपये घेतले गेले याची माहिती दिली आहे.

तसेच आपण लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. मी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे अनंत पीळणकर यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा