You are currently viewing रमजान सणानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची इफ्तार पार्टी संपन्न

रमजान सणानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची इफ्तार पार्टी संपन्न

सावंतवाडी

शहरासह तालुक्यांमध्ये हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये जातीय सलोखा राहावा यासाठी राष्ट्रीय काँग्रेस कडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

शहरातील बाहेरचा वाडा येथील मदिना मज्जिद येथे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आबिद नाईक यांच्या निवासस्थानी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या पुढाकाराने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या पार्टीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष ऍड दिलीप नार्वेकर इर्शाद शेख सावंतवाडी शहराध्यक्ष ऍड राघवेंद्र नार्वेकर असलाम खतीब रफिक नाईक मुस्ताक जामदार सलीम खतीब बशीर खतीब साद शिखा हीना पटेल जस्मिन लक्ष्मेश्वर बुष्रा शेख हबीब मुल्ला शबाना खाना हसीना खान अर्शिन खान सुमय्या मुंल्ला हर्षन खान जहाँआरा सोनी हसीना खान शाहिदा मुल्ला शाईन खातीब मुमताज नाईक रजिया नाईक मोहम्मद बागवान आयेशा धोनी अरमान धोनी आदीसह राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
मुस्लिम बांधवांचा सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे या पार्टीच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येतात शांतता आणि सलोख्याने एकमेकाच्या सणांमध्ये सुखदुःखामध्ये सहभागी होतात ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची परंपरा यापुढेही सुरू राहणार असल्याचे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष ऍड दिलीप नार्वेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले सर्व मुस्लिम बांधवांचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वागत केले.

सावंतवाडी शहरातील बाहेरच्या वाडा येथे राष्ट्रीय कांग्रेस तर्फे आयोजित करण्यात आलेल्याइफ्तार पार्टी मध्ये सहभागी झालेले बांधव

प्रतिक्रिया व्यक्त करा