You are currently viewing आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा गटाला धक्का

आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा गटाला धक्का

आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा गटाला धक्का

वैभववाडी उबाठा चे माजी शहरप्रमुख विलास सरवणकर यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

आ. नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यात आमदार नितेश राणे यांनी उबाठा पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. उबाठा पक्षाचे माजी शहर प्रमुख विलास सरवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्यां सर्व कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
विलास सरवणकर हे कोकिसरे येथील रहिवाशी आहेत. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. सहा वर्ष त्यांनी वैभववाडी शहर प्रमुख पदावर काम केले. तसेच विभाग प्रमुख पदावर ही त्यांनी काम केले होते. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपा पक्षाची ताकद वाढली आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये राजेंद्र पोटफोडे, राजश्री पोटफोडे, सुरेश जठार, नितीन जठार, सुवर्णा जठार, वैभव पोटफोडे, सुलोचना जठार यांचा समावेश आहे.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, प्रकाश पाटील, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, बंड्या मांजरेकर, अवधूत नारकर, राजेश सरवणकर, सज्जन माईंणकर, उदय पांचाळ व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा