You are currently viewing भजनप्रेमी भालचंद्र केळुसकर यांचा भव्य सत्कार सोहळा

भजनप्रेमी भालचंद्र केळुसकर यांचा भव्य सत्कार सोहळा

मालवण :

 

सिंधुरत्न, संगीत रत्न पुरस्कार प्राप्त, कोकण भजन, लोकप्रिय बुवा भालचंद्र केळूसकर यांच्या भव्य जाहीर सत्कार सोहळा ३ मे रोजी वायरी भूतनाथ येथील भूतनाथ रंगमंच येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त ३ व ४ मे रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत नाट्य मंडळ वायरी भूतनाथ, भूतनाथ प्रासादिक भजन नाट्य मंडळ, श्री भुतनाथ युवा प्रतिष्ठान, वाईरकर रापण संघाचे वायरी भूतनाथ, श्री भूतनाथ नूतन नाट्य समाज, श्री नाट्य मिनार कला निकेतन, श्री भूतनाथ नवतरुण मंडळ आणि वायरी भूतनाथ ग्रामस्थ यांच्यावतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

वायरी गावातील अनेक ज्येष्ठ कलावंतांनी भजन आणि नाट्य कला संस्कृती आजही जपून ठेवली आहे. अशा कलावंतांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्याचे निश्चित केले आहे. यात ३ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता भजनी बुवा भालचंद्र केळुसकर आणि वायरी गावातील जेष्ठ भजन नाट्य कलावंतांचा सत्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्यास खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहे. याच दिवशी रात्री ९ वाजता होणार श्री भूतनाथ प्रासादिक भजन नाट्य मंडळ यांच्यावतीने ट्रिक्सीनयुक्त संगीतमय पौराणिक नाटक “संत गोरा कुंभार” यांचे सादरीकरण होणार आहे.

या सोहळ्यास जिल्ह्यातील भजन प्रेमी, नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वायरी भूतनाथ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + six =