You are currently viewing कोळेकर भगिनींसाठी मुख्याधिकारी जावडेकर यांचा मदतीचा हात

कोळेकर भगिनींसाठी मुख्याधिकारी जावडेकर यांचा मदतीचा हात

माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी मदतीचे केले आहे आवाहन

सावंतवाडी

गरीब कोळेकर भगिनींच्या घर उभारणीसाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरवासीयांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील शहराचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी तब्बल 37 हजार रुपयाचे पत्रे देऊन सिंहाचा वाटा उचलला आहे. याबाबत श्री साळगावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केली आहेत.

कोळेकर भगिनींच्या बाबत वृत्तपत्रातून व सोशल मिडिया च्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्यानंतर श्री साळगावकर यांच्याकडे शहरातील काही जणांनी रोख रक्कम जमा केली आहे अशाच प्रकारे मदतीसाठी लोकांनी पुढे यावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा