विविध प्रश्नांची सरबत्ती करत मुख्याधीकारयांना धारेवर धरले
सात दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्याधिकारयांचे आश्वासन
वेंगुर्ले
भाजपा शिष्टमंडळाने चर्चेसाठी मुख्याधिकारी यांची वेळ मागीतली असताना सुद्धा चर्चेला वेळ न दिल्याने गनिमी काव्याने भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी दालनात धडक दिली व घेराव घातला .
वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय कार्यकाळ सुरू झाल्यापासून प्रशासन व कर्मचारी यांचा ताळमेळ नसल्याने वेंगुर्ले शहरातील झालेल्या विकासकामांवर दुर्लक्ष होताना दिसत आहे . स्वच्छतेच्या बाबतीत संपुर्ण देशात एक नंबर असलेल्या नगरपरिषदेची अवस्था अस्वच्छतेकडे जाताना दिसत आहे . तीन महिन्यातील प्रशासकीय कारभारामुळे वेंगुर्ले शहराचा विकास खुंटला आहे तसेच समस्यांचे डोंगर तयार झाले आहेत.
क्राॅफर्ट मार्केट व सागररत्न मस्त्य बाजारपेठ मध्ये घाणीचे साम्राज्य , स्वच्छ भारत पर्यटन स्थळाची लागलेली वाट , कॅम्प स्टेडीयम मधील क्रिकेट पीच ची परीस्थिती , सागर हाॅलीडे रीसोर्ट ची दुरावस्था , मानसीश्वर उद्यानाची झालेली दुरावस्था , नगरपरिषद टाॅवर वरील बंद पडलेले घड्याळ , सार्वजनिक टाॅयलेटची दुरावस्था व नीट साफसफाई नसणे , अग्नीक्षामक केंद्रावरील उडुन गेलेले पत्रे , वाॅटर एटीएमची झालेली दुरावस्था , दाभोली नाका ते निमुसगा रस्त्यावर झालेले डंपींग ग्राउंड , भटवाडी डाॅन्टस काॅलनी ते किनळेवाडी रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम , घोडेबाव गार्डन मधील वेळोवेळी बंद असलेला कारंजा , नातु व्हाळी वरील सांडपाणी प्रकीया युनीट चे रखडलेले काम , कलादालन व सभागृह मधील अस्वच्छता , मच्छीमार्केट मधील कोलस्टोरेज बंद स्थीतीत , मच्छीमार्केट व व्यापारी संकुल मधील फायर सिस्टीम बंदस्थीतीत , आनंदवाडी मधील गटारामध्ये घाणीचे साम्राज्य , वेंगुर्लेकर वाडीतील फुटलेली पाण्याची टाकी असे जवळपास ५४ मुद्द्यावर चर्चा करुन मुख्याधिकारी यांना भंडाऊन सोडले .
यावेळी मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे यांनी प्रत्येक प्रश्नावर चर्चा करुन त्या त्या विभागाच्या प्रमुखांना बोलवून येत्या सात दिवसात सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले , तसेच भाजपा शिष्टमंडळास येत्या आठ दिवसात जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लागतील असे अभिवचन दिले . तसेच प्रशासकीय कारभार सुधारेल अशी ग्वाही दिली .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , माजी नगराध्यक्ष राजन गीरप , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , माजी नगरसेवक प्रशांत आपटे व धर्मराज कांबळी , माजी नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर , ता.चिटणीस समीर चिंदरकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर – रसीका मठकर – आकांक्षा परब , अल्पसंख्याक सेलचे रफीक शेख , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , बुथप्रमुख शेखर काणेकर , शैलेश मयेकर इत्यादी भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते .
,