देवगड
देवगड पवनचक्की वरील गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश किया करण्याला आमदार नितेश राणे यांनी तीव्र विरोध केला आहे यामुळे पर्यटकांचा ओघ कमी होईल अशी धोक्याची सूचना त्यांनी पत्र लिहून देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना दिली आहे
या पत्रात त्यांनी लिहिले आहे की देवगड-जामसंडे नगरपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेले पवनचक्की गार्डन
हे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले आहे. त्यामुळे पवनचक्की गार्डन पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत
आहे. अशा परिस्थितीमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये पर्यटकांवर १० रू. प्रवेश शुल्क आकारण्याचा ठराव करण्यात आला
असल्याचे समजते.
सदरहू ठरावाची अमंलबजावणी झाल्यास पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होवू शकते. त्याचा परिणाम शहराच्या अर्थ कारणांवर होवू शकतो. सबब पवनचक्की गार्डन पाहण्यासाठीचा प्रवेश शुल्क आकारणीचा ठराव रद्द
करण्यात यावा अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे