You are currently viewing मारहाणप्रकरणी पत्रकार विनायक गांवस यांचे नाव वगळावे

मारहाणप्रकरणी पत्रकार विनायक गांवस यांचे नाव वगळावे

जिल्हा पत्रकार संघाचे सावंतवाडी पोलिसांना लेखी निवेदन

सावंतवाडी

कोलगाव येथील वीज कर्मचारी मारहाण प्रकरणी नाहक गोवण्यात आलेले पत्रकार विनायक गांवस यांचे नाव एफ आय आर मधून वगळावे या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे आणि मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा खजिनदार संतोष सावंत जिल्हा कार्यकारणी सदस्य हरिश्‍चंद्र पवार सागर चव्हाण तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे उमेश सावंत प्रशांत सावंत आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यानाही याबाबतचे निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक कोरे यांच्याकडे सादर करण्यात आली सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना सादर करण्यात आलेल्या लेखी निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडीतील पत्रकार श्री. विनायक गांवस यांच्यावर अन्यायकारक कारवाई न करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे या निवेदनामध्ये
असे म्हटले आहे की बुधवारी २० एप्रिल रोजी मध्यरात्री सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील वीज वितरण कंपनी कार्यालयातील अभियंत्यास मारहाण झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीमध्ये सावंतवाडी येथे पत्रकारिता करत असलेले पत्रकार श्री. विनायक गांवस यांचेही नाव घातले आहे.

विनायक गांवस यांनी जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आपण तिथे पत्रकारिता करण्यासाठी पत्रकार म्हणून गेलो होतो. असे असतानाही फिर्यादीने आपले नाव नमूद केले असून ही बाब अन्यायकारक आहे. विनायक गांवस हे आपल्या दैनिकासाठी व चॅनलसाठी पत्रकारिता करण्यासाठी गेले होते आणि तिथे त्यांनी आपले पत्रकारितेचे कर्तव्य पार पाडले, असे असताना जर श्री. गांवस यांच्यावर सावंतवाडी पोलिसांकडून कारवाई झाली तर ते अन्यायकारक होईल.

घटना कुठलीही घडली तरी तिथे जाऊन शक्य तितके वृत्तांकन करण्याचे कर्तव्य पत्रकार प्रामाणिकपणे पार पाडत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकार नेहमी पोलिसांना सहकार्य करत असतात. अशावेळी पत्रकारिता करण्यासाठी गेलेल्या गांवस यांच्यावर अन्यायकारक कारवाई झाली तर ते चुकीचे ठरेल. यात गांभीर्याने लक्ष चालून श्री. विनायक गांवस यांच्यावर अन्याय होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशी विनंती जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गणेश जेठे आणि मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांनी केली आहे दरम्यान पत्रकार आणि पोलीस यांचे संबंध जिल्ह्यामध्ये सलोख्याचे आणि मैत्री पूर्ण आहेत या घटनेतून हे संबंध बिघडू नये याची दक्षता पोलिसांनी घ्यावी अशी विनंती राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 15 =