You are currently viewing माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी….

माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी….

देवगड  :

माध्यमिक विद्यामंदिर साळशी, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित ऑनलाईन रांगोळी, ऑनलाईन वक्तृत्व व ऑनलाईन हस्ताक्षर या विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. प्रत्यक्ष दिनांक 02 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 09.15 वाजता प्रतिमांचे पूजन, स्वच्छता केली. व यानिमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचे व मार्गदर्शक, सूत्रसंचालक – शिक्षक श्री . साटम सर, यांचे

मुख्याध्यापक श्री.वंजारे सर यांनी र्ऑनलाईन हार्दिक अभिनंदन, आभार व्यक्त केले. यावेळी शिक्षक मराठे सर व शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते. तसेच माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे ऑनलाईन
२ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त ऑनलाईन भाषण स्पर्धा घेण्यात आली.
लहान गट मध्ये इयत्ता ८ वी. मधुन प्रथम क्रमांक कुमारी.रिया ज्ञानेश्वर भोगले, द्वितीय क्रमांक कुमारी.काजल कुलदीपक घाडी, तर मोठा गट मध्ये इयत्ता ९वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांमध्ये
प्रथम क्रमांक कु.हर्षाली अनिल पवार, द्वितीय क्रमांक कु.तन्वी दिपक सावंत, तृतीय क्रमांक
कु. राज रवींद्र साळसकर. तसेच ऑनलाईन हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.
गांधी जयंती सप्ताहा निमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन हस्ताक्षर स्पर्धेत
लहान गट मध्ये इयत्ता ८ वी. प्रथम क्रमांक कु.रिया ज्ञानेश्वर भोगले, द्वितीय क्रमांक कु.मनोज महेश भोगले,
तृतीय क्रमांक कु.अथर्व सत्यवान राणे, व मोठा गट इयत्ता ९ वी ते१०वी मध्ये
प्रथम क्रमांक कु.तन्वी दिपक सावंत, द्वितीय क्रमांक कु.चिन्मयी चंद्रकांत घाडी, तृतीय क्रमांक कु.लोचन भगवान देवणे. तसेच यावेळी ऑनलाईन रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
गांधी जयंती सप्ताहा निमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत
लहान गट मध्ये इयत्ता ८ वी. मधुन प्रथम क्रमांक
कुमार.ऋग्वेद राजेंद्र साटम,
द्वितीय क्रमांक कु.विश्राम प्रमोद परब, तृतीय क्रमांक
कु.रिया ज्ञानेश्वर भोगले, व मोठा गट मध्ये इयत्ता ९वी ते १०वी. मधुन प्रथम क्रमांक कु. चिन्मयी चंद्रकांत घाडी,
द्वितीय क्रमांक कु. विशाल गजानन भिसे, तृतीय क्रमांक कु. राज रवींद्र साळसकर या सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 8 =