महाराष्ट्र शासनाकडून शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज, सांगली या संस्थेकडून प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येते, अशी माहिती अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज-सांगली यांनी दिली.
प्रौढ दिव्यांगासाठी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात येतअसून, यामध्ये संगणक कोर्ससाठी किमान शैक्षणिक पात्राता 8 वी पास तर इलेक्ट्रीक कोर्ससाठी किमान 9 वी पास असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 16 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असणार आहे. फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो. सदर प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, भोजनाची व प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडण्यात याव्या. अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली पिनकोड- 416410 किंवा 0233-2222908, 7972007456 या दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.