You are currently viewing कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय बारावीचा निकाल १००%

कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय बारावीचा निकाल १००%

कणकवली :

ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै.राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), फोंडाघाट या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा – २०२५ चा निकाल सलग १५व्या वर्षी १००% लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण ६६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीमधून व ३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमधून उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम क्रमांक कु.ऋतुजा महेश पडवळ (४३०) ७१.६७%, द्वितीय क्रमांक कु.जानवी संजय पवार (४२५) ७०.८३% व तृतीय क्रमांक कु.हर्षदा जयेंद्र जळवी (४१६) ६९.३३% मिळवत उत्तीर्ण झाले.

२००९ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यालयाचा निकाल सातत्याने १००% लागत असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थाध्यक्ष मा.श्री.दिपेश नामदेव मराठे, सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य श्री.जयराज राऊळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा