You are currently viewing दिवाळी सुट्टीनंतर शाळा परिसर गजबजला

दिवाळी सुट्टीनंतर शाळा परिसर गजबजला

बांदा

दिवाळी सुट्टीच्या आनंदानंतर आज बुधवारी सन 2022-23 च्या शैक्षणिक वर्षातील द्वीतीय सत्राची सुरवात सर्वच शाळांमधून मोठ्या उत्साहाने झाली.दुसऱ्या शैक्षणिक सत्रात शैक्षणिक सहल,वनभोजन,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव,विज्ञान प्रदर्शन, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा,बाल आनंद मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण ,हळदीकुंकू ,शालेय परसबाग असे विविध सहशालेय उपक्रम राबविले जातात.तसेच शिष्यवृत्ती व नवोदय तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा या सत्रात विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत.अशा विविध नानाविध उपक्रमांची रेलचेल असणारे शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र आनंददायी ठरो यासाठी बांदा नं.1 केंद्र शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या दिवशी विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, पदवीधर शिक्षिका उर्मिला मौर्ये, उपशिक्षिका शुभेच्छा सावंत,जागृती धुरी, वंदना शितोळे,प्राजक्ता पाटील, शितल गवस ,रंगनाथ परब ,जे.डी.पाटील ,गोपाळ साबळे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा