You are currently viewing बालपण

बालपण

*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूरचे सदस्य कवी सुरज सोमकुवर यांची अप्रतिम काव्यरचना*

 

*बालपण*

 

लहानपणीचे दिवस सर्व आनंदाचे होते..

रानातल्या झाडावर बांधलेला तो पाळणा होता ..

एका पाळण्यावर झोपाळा घेणारे ते मी आणि माझे बालगोपाल मित्र होते..!

 

गेले हरवले ते बालपण आता..

आता नको ती बंधने आली ..

लाड नाही, हट्ट नाही, सगळीकडे कसे गांभीर्याचे वातावरण झाले..!

 

उरला नाही कोणाचकडे आता तो बालपणीचा निरागस भाबडेपणा..

लहानपणीचे सर्व बालगोपाल मित्र मंडळी आता मोठी झाली..!

 

बालपण हरवलं म्हणजेच आता वाट्याला मोठ्या सारखे वागणे आले..

पण या मोठेपणाच्या वागण्यात मला माझे हरवलेले बालपण पुन्हा कधीच न गवसणारे झाले..!

 

 

✍️सुरज सोमकुवर

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 16 =